सातारा ( सम्राट गायकवाड ) : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रीपद ह्यावरून महायुतीत घोडे आडले असताना एक exclusive माहिती न्युज अजिंक्य सह्याद्रीच्या हाती आली आहे. ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पर्यटन खात्यासह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येणार आहे. तर ना.मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती नागपूरहून सूत्रांनी दिली.
ना.शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात येणार असून त्यांना पालकमंत्री म्हणून हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ना.जयकुमार गोरे यांना कृषी अथवा कामगार मंत्री खाते मिळण्याची शक्यता असून त्यांना पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी नागपूर येथून माहिती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा