सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

फलटणमध्ये दोन आमदार, मा. खासदार निवासस्थान मार्ग झाला धोकादायक ; अखेर नागरिकच सरसावले

सातारा : फलटण शहरातील नागरिकांना लाखो रुपये पालिकेचा कर भरून देखील पायाभूत सुविधा मिळत नसल्याची मोठी परंपरा आहे. मात्र, आता फलटण शहराचा राजपथ असलेल्या दुहेरी रिंगरोडची अक्षरशः चाळण झाली आहे.  विशेष बाब म्हणजे हा मार्ग फलटणच्या  राज्यकर्त्यांच्या निवास्थानाकडे जातो व येतो. मार्गावर अनेक खड्ड्यांपैकी एक भला मोठा व खोल खड्डा अहिल्यादेवी होळकर चौक ( पृथ्वी चौक) येथे निर्माण झाला. नेमकी अपघाताची होण्याची शक्यता ओळखून परिसरातील नागरिक पुढे सरसावले आणि त्या खड्ड्याच्या बाजूला नारळाच्या झाडाचे बॅरीगेट उभारून होणारे अपघात टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

विधानपरिषदेचे माजी सभापती आ.रामराजे ना. निंबाळकर, आ.सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष विजयराव बोरावके यांच्यासह दिग्गज राजकीय नेते व उद्योगपती यांच्या निवासस्थानाकडे हा मार्ग जातो व येतो. तसेच संबंधित खड्ड्यापसून काही मीटर अंतरावर विद्यमान आमदार सचिन पाटील यांचे संपर्क कार्यालय आहे. हे अधोरेखित करणे आवश्यक आहे. उर्वरित फलटण शहरातील एक ही रस्ता सामान्य नागरिकांना चालण्यासाठी देखील सुस्थितीत नाही.ही बाब अलहिदा. पण किमान फलटणच्या दिग्गज नेत्यांसाठी तरी खड्डेमुक्त राजमार्ग तथा रिंगरोड दुरुस्त करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...