फलटण : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फलटण शहरात आणि तालुक्यात कोठे, कधी आणि काय घडेल ? ह्याचा नियम नाही. येथे रोज नवनवीन घटना घडत असतात मात्र, अनेक कारणांनी समोर येत नाहीत. त्यापैकीच एक मात्र, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय इमारत परिसरात सध्या घडताना दिसून येते. येथे ग्रामीण भागातून रोज हजारो नागरिक आपल्या प्रशासकीय कामासाठी येत असतात. त्यांना सुलभ व स्वच्छ शौचालय व्यवस्था नाही. जी उपलब्ध आहे तेथे नागरिक सोडा अधिकारी देखील जावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला मात्र अधिकाऱ्यांना किंचितही त्रास होवू नये, यासाठी चक्क प्रशासकीय इमारतीच्या सर्व बाजूने सिमेंट कार्पेट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
तूर्त प्रशासकीय इमारतीच्या प्रांत कार्यालय, जि.प.बांधकाम विभाग, निरा देवघर प्रकल्प कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय असलेल्या परिसरात सिमेंट कार्पेट काम सुरू असल्याचे शनिवारी दिसून आले. अधिकाऱ्यांनी तथा लोक सेवकांनी हे काम करून घेण्यास कोणाचीही हरकत असता कामा नये. कारण एवढे मोठे काम हाती घेतलेच आहे तर साहजिकच तेथे येणाऱ्या नागरिकांना ( कर दाते / Tax payer) यांच्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी देखील सुलभ व स्वच्छ शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न नक्कीच होतील, अशी अपेक्षा नूतन महिला प्रांताधिकारी यांच्याकडे नैतिक अधिकाराने व्यक्त केल्या जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा