सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

फलटण पालिका मुख्याधिकारी बदलीमध्ये ट्विस्ट ; राजकीय की विनंती बदली ?

सातारा : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे व माजी नगरसेवक अनुप शहा शहा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. निखिल मोरे यांची  अवघ्या वर्ष भरातच फलटण येथून पुणे येथे बदली झाली आहे.त्यांच्या बदलीनंतर अनुप शहा यांनी आनंद व्यक्त करत आणि माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आ.सचिन पाटील यांचे आभार व्यक्त करत  आपल्या पाठपुराव्यानेच निखिल मोरे यांची बदली झाल्याचा अप्रत्यक्ष दावा केला आहे.तर दुसऱ्या बाजूला निखिल मोरे हे स्वतः हुन मागील अनेक महिन्यापासून शासनाकडे बदलीसाठी विनंती करत होते.त्यामुळेच त्यांना गडचिरोली नव्हे तर पुणे सारख्या मोठ्या शहरात बदली मिळाली आहे, असे पालिकेतील सूत्रांनी ' अजिंक्य सह्याद्री न्युज'  प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

फलटणसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. परिणामी स्था.स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर  ( खासदार, आमदार वगळता ) स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा कोणताही अंकुश राहिलेला नव्हता व  पुढील काही महिने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार नाही. त्यामुळे साहजिकच अधिकारी व माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सूचना करून देखील कामे होण्यास विलंब होत आहे. त्यातूनच आक्रमक असलेले माजी नगरसेवक अनुप शहा व मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. दोघांमधील वाद टोकाला जात असताना मात्र माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा यशस्वी पूर्ण केल्याबद्दल मुख्याधिकारी निखिल मोरे व कर्मचाऱ्यांचा पालिकेत येवून अनुप शहा यांच्या उपस्थितीत सत्कार केला.


त्यानंतर तरी शहा व मोरे यांच्यातील वाद संपुष्टात येईल, अशी अपेक्षा कोंडी झालेले पालिकेतील कर्मचारी खासगीत व्यक्त करत होते. मात्र, मोरे यांची तूर्त बदली झाल्याने मोरे व शहा यांच्यातील वादाला स्थगिती मिळाली आहे. परंतु नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यापुढे अनेक आव्हाने असणार आहेत. त्यामध्ये फलटण शहराच्या मूलभूत समस्या व विकासात्मक आणि आगळ्या वेगळ्या राजकीय संघर्षाचा सामना करावा लागणार आहे, ही बाब जाताना निखिल मोरे हे निखिल जाधव यांना निश्चित सांगून जातीलच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...