शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

इलेक्शन झाले : lcb मधील कलेक्शन कर्मचारी बदलणार केव्हा ?

 सातारा :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तथा लोकल क्राईम ब्रांच ही पोलीस दलाचा आत्मा आहे. मात्र ह्या ब्रांच मध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी आमदार,खासदार यांच्या शिफारशी घ्याव्या लागतात. मात्र, गेली 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत.




स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोस्टिंग वरून आ.जयकुमार गोरे व तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद देखील झाला. परिणामी आ.जयकुमार गोरे यांनी डाव मारला. अरुण देवकर यांना चार्ज देण्यात आला. मात्र, सरदार बदलला पण दुय्यम शिलेदार गेली 15 वर्ष तल ठोकून आहेत.  


पोलीस दलात नव्याने दाखल झालेले कर्मचारी आपला हूनर दाखवण्यासाठी तयार आहेत.मात्र त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत संधी मिळत नाही. हे पाहता पोलीस दल नेमके कोणाच्या तालावर नाचतय हा संशोधनाचा विषय तर आहेच उलट गेली 8 ते 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असलेल्या कर्मचाऱ्याची साधी आर्थिक चौकशी होत नाही. ही शोकांतिका आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...