सातारा: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर सर्वत्र आणि सर्वच समजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर समाज सेविका अंजनिया दमानिया यांनी अमानुष हत्येचा निषेध व्यक्त केला आणि पुढे जावून शस्त्र बाळगणाऱ्याची चित्रे सोशल मीडियावर जाहीर केली.
अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यात देखील अशा पद्तीने व्यवस्था निर्माण केली गेलीय. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पवन चक्की सातारा जिल्ह्यात आहेत. मात्र, इथे खंडणी मागण्याचे प्रमाण अल्प आहे. परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि विशेषतः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खासगी शस्त्र आणि परवाना घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे खासगी शस्त्र का कोणासाठी आणि कशासाठी वापरत आहेत ? ही चर्चा सध्या सुरू असून जिल्हाधिकारी यांनी यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा