शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

मालन माने यांना राज्यस्तरीय आदर्शमाता पुरस्कार ; मा.राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतनगरी न्यूज नेटवर्क, कराड यांच्यावतीने यंदाचा राज्यस्तरीय आदर्शमाता पुरस्कार सातारा येथील मालन लाला माने, सातारा यांना सिक्कीमचे माजी राज्यपाल व ज्येष्ठ माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे आयोजित सोहळ्यात मालन माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ.अतुल भोसले, आ.मनोज घोरपडे, राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, यशवंत नगरी न्यूज नेटवर्कचे संपादक विकास भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य केलेल्या ११ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...