बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

रयत क्रांतीचे प्रकाश साबळे यांच्या मागणीला सत्तेतील शिवसेना व राष्ट्रवादीची साथ...! शेतकऱ्यांसाठी खासदार, मंत्री, आमदार देणार एक महिन्याचे वेतन


सातारा : मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे. साबळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील साथ देत मदत जाहीर केली आहे.



ना. एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.  मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात दिला आहे. राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे.  नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तर,उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या आदेशानुसार  सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना प्रमुख यांनी जाहीर केलेल्या मदतीचे रयत क्रांतीचे प्रकाश उर्फ सोनू साबळे आभार व्यक्त केलेत.

दरम्यान, सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून येणारे नाही. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी बुधवारी सकाळी केले होते. त्यानंतर राज्यभरातून राजकीय नेत्यांनी मदतीची भूमिका घेण्यास सुरुवात केली.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे देखील मदतीसाठी पुढाकार घेणार असून राज्यातील विद्यमान विधानपरिषदेतील २८८ व विधानपरिषदेतील ८५ आमदार तसेच राज्यातील ४८ खासदार यांनी आपले सहा महिन्याचे वेतन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला द्यावे. त्याचप्रमाणे गेली वर्षोंनु वर्ष पेन्शन घेत असलेल्या माजी खासदार व आमदार यांनी आता शेतकऱ्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांनी देखील सहा महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन साबळे यांनी केले. तसेच सातारा जिल्ह्यातील उद्योगपती यांनी देखील CSR तरतुदीनुसार त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाने देखील आपले एका महिन्याचे वेतन व तीन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी, असे देखील आवाहन साबळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...