सातारा : विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिक्षण आणि अनुकरण करण्यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शक केंद्र म्हणजेच बुध्द विहार हे साखरवाडी, तालुका फलटण येथे उभारण्यात यावे,ह्या मागणीसाठी फलटण तालुक्यातील हजारो अनुयायी यांचा लढा सुरू आहे. 30 किलोमीटरचा साखरवाडी ते फलटण तहसील कार्यालय लाँग मार्च करून पुढे 3 दिवस फलटण तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
10 हजार मतदार असलेल्या ह्याच साखरवाडी गावात विधानसभा निवडणुकी दरम्यान, अजित पवार यांनी भले मोठे भाषण ठोकले . राजे कंपनीचे मालक संजीवराजे यांनी देखील मोठे ह्याच साखरवाडी गावात भाषण ठोकले. मात्र, लोकांच्या पदरात काय ? जे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मुळे आमदार झालेले माजी आमदार दीपक चव्हाण आणि विद्यमान आमदार सचिन कांबळे हे देखील आंदोलन स्थळी आले नाहीत, हे निषेधार्ह आहे, असल्याची माहिती आंदोलनकर्ते देत आहेत.
मात्र, ज्या पुरोगामी तत्त्वाचा चेहरा, राजे & कंपनी आणि ना.अजित पवार पांघरून होते. दोघांचा खरा चेहरा आंदोलनाने उघड केला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समर्पित करून देशातील 140 कोटी लोक संख्येला समता तत्वार न्याय दिला. मात्र, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिक्षा घेतलेले गौतम बुद्ध यांचे विचार प्रेरणास्थान उभारण्यासाठी 75 वर्षा नंतर देखील अनुयायी यांना संघर्ष करावा लागत असेल तर आत्मचिंतन राज्यकर्ते ना.अजित पवार व 30 वर्ष राज्य केलेल्या आ.रामराजे नाईक निंबाळकर तसेच आ. सचिन कांबळे माजी आमदार दीपक चव्हाण आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा