सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

दोन मोठ्या निवडणूका विरोधात ; फलटणमध्ये राजेगटाच्या प्रेरणास्थानी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार...!

 
सातारा: लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतदेखील महायुतीच्या व परिणामी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या फलटणच्या राजेगटाच्या  प्रेरणास्थानी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. सोमवारी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे ना. निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्यासह संचालक व सदस्य उपस्थित होते. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुद्रित वार्षिक अहवाल सदस्यांना माहितीसाठी देण्यात आले. अहवालावर विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्फूर्तीस्थान म्हणून स्थान कायम ठेवल्याचे लक्षवेधी होते. कारण 10 महिन्यापूर्वी झालेल्या विधासभा निवडणुकीत अजित पवार यांनी तत्कालिन आमदार दिपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली मात्र राजे गटाने त्यावेळी खा.शरद पवार तथा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ना. अजित पवार यांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली. मतदारसंघात तीन सभा घेऊन राजे गटावर तिखट शब्दात टीकास्त्र केले. परिणामी राजे गटाचे आ.दिपक चव्हाण यांचा पराभव करून ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन कांबळे पाटील हे निवडून आले. 

हा पराभव राजे गटासाठी मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर पुलाखालून राजकीय पाणी गेले. नुकत्याच झालेल्या माळेगांव ( बारामती) सहकारी कारखाना निवडणुकीत राजे गटाने फलटण तालुक्यातील सभासदांचे मतदान ना. अजित पवार यांच्या पॅनलला होण्यासाठी भरघोस मदत केली.त्यानंतर पुन्हा एकदा राजे गट आणि ना. अजित पवार यांची राजकीय जवळीक वाढू लागली असून त्याचेच प्रतिबिंब सोमवारी झालेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेच्या मुद्रित वार्षिक अहवालात दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...