सातारा : एकेकाळी आर्थिक अडचणीत आलेला फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना अवसायनात काढून पुढे होणाऱ्या लिलावा प्रक्रियेत खरेदी करा, असा सल्ला दिवंगत तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिला होता, असा गौप्यस्फोट विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशमुख यांचा सल्ला न स्वीकारता कारखाना वाचवून आणि सहकारी तत्वावर चालवून अडचणीतून बाहेर निघत आहे. मात्र, आज जे विरोधक कारखान्यावर आरोप करत आहेत ते तेव्हा काँग्रेसमध्ये होते असे माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांना टोला लगावला.तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतलेले माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले हे कारखाना अडचणीत असताना नोकरी करत होते, असे थेट टोला व्यासपीठावर उपस्थित भोसले यांना रामराजे ना निंबाळकर यांनी लगावला. तसेच न्यायालयात दाखल केलेली याचिका भोसले यांनी मागे घ्यावी व निवडणुकीला सामोरे यावे, असे आव्हान देखील रामराजे ना निंबाळकर यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा