मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

फलटणमध्ये कॅनॉलचे अस्तरीकरण ...! नेमका लाभ कोणाला ? तालुक्यात विविध चर्चांना उधान

सातारा : बारामतीकरांना माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्यानंतर अनेक वर्षाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आव्हान दिले. ज्या नीरा देवघर धरणाच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून आव्हान दिले त्या नीरा देवघरच्या पाणी वाटपाला महायुतीच्या मनोमिलनाने स्थगिती मिळाली आहे  मात्र, सध्या फलटण शहरात हजारो खड्डे पडलेले असताना दुसऱ्या बाजूला मात्र शहरातून 
जाणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. नेमके हे काम कोणाच्या भल्यासाठी सुरू आहे ? असा प्रश्न आणि विविध चर्चांना तालुक्यात उधान आले आहे.

नीरा उजवा कॅनॉलच्या अस्तरीकरणाला काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून प्रखर विरोध केला होता. त्यावर उपाय म्हणून शेती क्षेत्र वगळून सध्या अस्तरीकरणाचा पहिला टप्पा बारामती पूल ते पंढरपूरपूल ते रावरामोशी पूल  ( फलटण शहर व कोळकी हद्द) एवढे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या पंढरपूरपुला नजिकचे काम जोमाने सुरू आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, असतरीकरणामुळे कॅनॉललगतचे नागरी क्षेत्र सुरक्षित व्हावे, यासाठी काम हाती घेतले असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अस्तरीकरणामुळे त्या परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीवर काय परिणाम होतो , हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, तो पर्यंत फलटण शहर आणि कोळकी गावच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...