सातारा : पाच लक्ष रुपयेपेक्षा जास्त किमतीचे दिवाणी दावे चालविण्यासाठी सातारा येथे जावे लागणाऱ्या फलटण तालुक्यातील सुमारे दिड हजार पक्षकार तसेच वकिलांचे हेलपाटे थांबणार आहेत. फलटण येथेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करणे बाबत मागील वीस वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित होता. फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी याबाबत ११/१२/२०२४, रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, यांना फलटण येथील प्रस्तावित वरिष्ठ दिवाणी न्यायालय अंतिम मान्यता मिळणे व पदस्थापना आणि निधीची तरतूद होणे बाबत विनंती केली होती. तसेच याबाबत नुकतेच 12 सप्टेंबर 2025, रोजी फलटण वकील संघ यांनी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेबाबत, प्रस्तावातील त्रुटी पूर्तता करण्यासाठी फलटणमधील वकील संघाचे शिष्टमंडळ( ॲंड नितीन जाधव,ॲंड सचिन शिंदे ,ॲंड
सागर देशपांडे व इतर ) दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी, मुंबई येथे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, सचिन पाटीलयांचे सह विधी न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे, विधी न्याय विभाग सचिव श्रीमती किवले मॅडम, तसेच मंत्रालय मुख्य सचिव श्री श्रीकर परदेशी , व इतर यांना समक्ष भेटून प्रस्तावा मधील त्रुटी दूर करून, मुख्यमंत्री कार्यालयातून छाननी करून अर्थ खात्याची मंजुरीसाठी पाठवले होते.
त्यावर आज दिनांक 30/9/2025 रोजी फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करणे बाबत मंत्रिमंडळ मध्ये मंजुरी देण्यात आली, यासाठी फलटण वकील संघाचे आजी-माजी अध्यक्ष, यांनी योगदान दिले, तसेच माजी खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांनी पाठपुरावा केला त्यांचे विशेष आभार फलटण वकील संघ कार्यकारणी व अध्यक्ष ॲंड नितीन जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा