मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

तेलगी घोटाळ्यानंतर स्टॅम्प विक्रेत्यांसाठी सरकारने प्रथमच घेतला मोठा निर्णय

सातारा : तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर सरकारने नव्याने मुद्रांक तथा स्टॅम्प विक्रीचे नव्याने परवाने देणे बंद केले होते. मात्र, तत्पूर्वीच्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना अटी व शर्तींवर परवाने हस्तांतर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

मुद्रांक विक्रेत्यांचा मृत्यू झाला असल्यास, बेपत्ता झाला असल्यास अथवा शारीरिक, मानसिक अक्षमता , वृद्धत्व कारणाने काम करू न शकणाऱ्या वारसांना उपजिविकेसाठी अटी व शर्तींवर परवाने हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर शासनाने नव्याने परवाने बंद केले होते. बँक, पोस्ट कार्यालय, फ्रँकिंग व ई पेमेंट द्वारे स्टॅम्प ड्युटी ( शुल्क) अदा केले जात आहे. मात्र, किरकोळ व्यवहार आणि नोटरीसाठी स्टॅम्प आज तितकेच आवश्यक असल्याने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्टॅम्प विक्रेत्यांनी स्वागत व आभार व्यक्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...