शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

हॅलो..माईक टेस्टिंग... मंडपवाले आवाज वाढवा ! ११ वर्षाने सदाभाऊ खोत यांचे होणार फलटणरांना दर्शन आणि मार्गदर्शन. .!

सातारा ( सम्राट गायकवाड) : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे नेते, मंत्री आणि दोन वेळा आमदार झालेले ( पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना ) रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत तब्बल ११ वर्षानंतर फलटण  तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येणार आहेत. राज्यात सत्ता असलेल्या महायुती सरकारमध्येच आमदार असलेले आ.सदाभाऊ खोत सरकारच्याच धोरणांच्या विरोधात राज्यात ठीकठिकाणी मोर्चे करत असताना आता त्यांना तब्बल ११ वर्षानंतर माढा लोकसभा मतदार संघातील फलटण तालुक्याची सक्रिय आठवण झाली आहे. त्यामुळे साहजिकच २०१४ च्या माढा लोकसभा निवडणूकीत सदाभाऊ खोत यांना मतदान केलेल्या मतदारांसाठी एक प्रकारे खोत यांचे दर्शन घेण्याची तसेच मार्गदर्शन देखील ऐकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

राज्य सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यात बदल करण्यात यावा. गाईच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर, उसाला प्रति टन 4 हजार रुपये दर मिळावा, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देखील मिळावी, ह्या मागण्यांसाठी २३ सप्टेंबररोजी विधानसभेवर नव्हे तर फलटण तहसिल कार्यालयावर आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह जनावरे व्यावसायिक यांच्या भल्यासाठी मोर्चा निघतोय हे उत्तमच परंतु त्या निमित्ताने सदाभाऊ खोत यांना तब्बल ११ वर्षाने फलटणची आठवण होणे हे देखील सुवर्ण अक्षरात लिहण्यासारखा योग म्हणावा लागेल.
कारण, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार प्रतिनिधित्व करत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात मोदी लाटेत भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ( पक्ष) यांच्याकडून थेट सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली. अटीतटीच्या झालेल्या लढतीत खोत यांचा निसटता पराभव झाला. मात्र, त्या निवडणूकीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदासंघातील मतदारांनी खोत यांच्या पारड्यात भरघोस मते टाकली. परंतु त्यानंतर खोत राज्यात मंत्री आणि दोन वेळा विधान परिषदेचे आमदार देखील झाले. एवढेच काय, सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून देखील संधी देण्यात आली. माञ, फलटण तालुक्याकडे खोत यांनी ११ वर्षात ढुंकूनही पाहिले नाही. तेच आणि सत्तेत असलेले आमदार सदाभाऊ खोत ११ वर्षानंतर पुन्हा फलटणला येत आहेत. तेव्हा ' आमानी आणि तुमानी'  हे नीट ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम चांगली असावी, अशी अपेक्षा खोत यांचे फलटण येथील रसिक श्रोते व  पूर्वाश्रमीचे मतदार व्यक्त करताना दिसून येत आहेत.





 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...