सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच सावध केलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांची स्वतःच्या माण तालुक्यात आणि जिल्ह्यात तसेच कुटुंबात देखील नालस्ती झालीय. त्यांच्या थोरल्या वाहिनी तसेच चुलत भाऊ दोघांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झालाय. तर त्यांनी सातारा जिल्ह्यात घेतलेल्या सभांमध्ये बहुतांश उमेदवारांचा पराभव झाला आहे.
रेशनिंग दुकानदाराचा पोरगा म्हणून सभेत एका बाजूला संबोधित करत सहानुभूती घेत असताना दुसऱ्या बाजूला सरंजामशाही आणि घराणेशाही जोपासण्याला माण आणि खटाव तालुक्यातील जनतेने ओळखले. इंटरनेट आणि AI च्या जगात शिंगणापूर आणि वारुगडच्या पोराला सत्य समजते. पाण्याच्या प्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात आलात . मतदारांनी उचलून घेतले प्रसंगी आपटण्याचा ही प्रयत्न केला. मात्र, 17 वर्षात अद्याप माण खटाव मतदारसंघातील पाणी प्रश्न समूळ नष्ट झालेला नाही.
माण आणि खटाव तालुक्याचे हक्काचे पाणी किती ? ते वितरीत होते का ? ह्यावर बोलणारे डॉ येळगावकर यांना शांत केले तरी मतदारांनी मतदानातून आपले मत व्यक्त केले आहे. मोगराळयाच्या घाटावरून खाली येऊन फलटणच्या घराणेशाहीवर टीका केली. आणि स्वतः काय केले ? तीन भावांना उमेदवारी ? एक उजवा हात. दुसरा चाणक्य. छोटा बाहुबली. उजवा हात आणि चाणक्य म्हणणारे घरी बसले. बाहुबली निवडून आले. ( कान कोणाला गमवायचा नव्हता)
एकूणच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी एक घोषणा करून दीड वर्ष झाले. ग्रामविकास विभागात लाडकी बहीण त्यावर मताचा जोगवा निवडणुकीत मागितला. मताचा जोगवा ग्रामविकास खात्याच्या प्रभावी कामगिरीवर मागायला हवा होता. मात्र, ठोस कामगिरी शून्य.
पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची योजना त्यात राज्य सरकार सहभाग घेईल आणि 50 हजार अनुदान देईल. छाती बडवून सांगितले. दोन वर्ष उलटून ही राज्य सरकारचे 50 हजार देण्यात जयकुमार गोरे ग्रामविकासमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. कार्यकर्ते,मतदार आणि पक्ष वापरून आणि फेकून द्या. ही रणनिती आता मतदार आणि सर्व पक्षांनी ओळखली असून त्यामुळेच ग्रामविकास मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांची लाज विरोधकांनी राज्यात घालवली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीला अजून साडे तीन वर्ष शिल्लक आहेत. कसे वागायचे हे..हे प्रभाकर देशमुख यांनी ठरवले पाहिजे.