मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४
सार्व.बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे, फलटण - सातारा रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावा : संतप्त जनतेची आर्त हाक
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
तब्बल तेरा वर्षानंतर सातारा पत्रकार संघाची आज वार्षिक सभा ; वादळी सभा होण्याचे सभासद पत्रकारांचे संकेत
स्वराज्य शक्ती सेनेच्या प.महाराष्ट्र अध्यक्षपदी कृष्णात माने यांची निवड ; अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती सातारा
ओबीसी न्यायप्रविष्ठ मुद्दा मार्गी लावून स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्या : काँग्रेस ओबीसी सेलची मागणी
बुधवार, १८ डिसेंबर, २०२४
ठरले...शिवेंद्रसिंहराजे पालकमंत्री ; मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन खाते..!
मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४
फलटण - सातारा महामार्गाचे दोन वर्षात केवळ ६ किलोमीटरचे काम : दुचाकीधारक व प्रवासी मेटाकुटीला ; ठेकेदाराला बांधकाम विभागाची नोटीस
भुजबळांसाठी ओबीसी पॉकेटमध्ये संतापाची लाट ; फलटणमध्ये बैठक ; ना.अजित पवारांचा निषेध : आमदार निवडून आणल्याची खंत व गर्भित इशारा
शनिवार, ७ डिसेंबर, २०२४
गॉड फादर नाही. ; नियुक्ती गडचिरोली ....?
सातारा : जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट पोलीस अधीक्षक अशी ओळख असलेले समीर शेख यांची थांबवलेली बदली आता होणार आहे. दुर्दैव एवढेच की आता त्यांच्या डोक्यावर हात नाही.मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांचे गेले आहे. तेव्हा शेख यांच्या कार्याचा रिपोर्ट ib संस्थेकडून शासनाला गेलाच असणार आहे. त्यामुळे शेख यांनी किती ही जोर लावला तर त्यांना क्रीम पोस्ट मिळणे अशक्य आहे.
शाहिद अशोक कामटे ते अभिनव देशमुख ते संदीप पाटील ते तेजस्वी सातपुते अशी उज्वल परंपरा सातारा पोलीस दलाला होती. मात्र, कोणतेही पुरावे नसताना अनेक निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे कार्य समीर शेख यांनी केले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शेख यांची ठाणे येथे बदली झाली परंतु पुढे स्थगिती देण्यात आली. आता निवडणुका झाल्या आहेत.ib संस्थेचा रिपोर्ट केंद्र व राज्य शासनाच्या गृह खात्याला पाठविला गेला असणार. त्यामुळे शेख यांना ठाणे नव्हे तर पुन्हा एकदा गडचिरोली पोस्टिंग मिळू शकते.
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४
इलेक्शन झाले : lcb मधील कलेक्शन कर्मचारी बदलणार केव्हा ?
सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तथा लोकल क्राईम ब्रांच ही पोलीस दलाचा आत्मा आहे. मात्र ह्या ब्रांच मध्ये पोस्टिंग मिळवण्यासाठी आमदार,खासदार यांच्या शिफारशी घ्याव्या लागतात. मात्र, गेली 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोस्टिंग वरून आ.जयकुमार गोरे व तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद देखील झाला. परिणामी आ.जयकुमार गोरे यांनी डाव मारला. अरुण देवकर यांना चार्ज देण्यात आला. मात्र, सरदार बदलला पण दुय्यम शिलेदार गेली 15 वर्ष तल ठोकून आहेत.
पोलीस दलात नव्याने दाखल झालेले कर्मचारी आपला हूनर दाखवण्यासाठी तयार आहेत.मात्र त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत संधी मिळत नाही. हे पाहता पोलीस दल नेमके कोणाच्या तालावर नाचतय हा संशोधनाचा विषय तर आहेच उलट गेली 8 ते 10 वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत असलेल्या कर्मचाऱ्याची साधी आर्थिक चौकशी होत नाही. ही शोकांतिका आहे.
गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४
मोकाट दारू, ताडी , गांजा, मटका विक्री सुरू ; पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा महिला करणार सन्मान
सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री आर.आर.पाटील यांनी एखादे गाव नशामुक्त तसेच तंटामुक्त राहावे, लेडी बार यासाठी उलटा कार्यक्रम राबविला. त्यांनी ग्राम सवच्छता तसेच तंटामुक्ती अभियान राबविले. मात्र, आर.आर.पाटील दिवंगत झाले आणि सर्व योजना बाजूला पडल्या.
गावोगावी सगळी यंत्रणा सुरू आहे. आदरकी पासून ते आंदरुड. आसू पासून उपलावे पर्यंत मोकाट सगळी यंत्रणा सुरू आहे. फलटण तालुक्यातील कोणत्याही गावात गेले की जो दारूचा ब्रँड पाहिजे तो मिळतोय. वाळू , दबर म्हणूनच गिरवी गावाच्या महिला प्रांत ऑफिस समोर आंदोलन केले.उलट आता 100 पेक्षा जास्त गावातील महिला व पुरुष आम्हाला पण ह्या धंद्याचे साधन उपलब्ध करून द्या, अशी मागणी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्याकडे सन्मानपूर्वक करणार आहेत.
मा.खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांची प्रशासनाला ॲलर्जी ? ; सत्ताधारी बदलूनही प्रशासनाची संकुचित मानसिकता कायम
फलटण : तब्बल 30 वर्षाची राजे गटाची सत्ता उल्थाण्यात माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांना यश आले असले तरी नगरपालिका प्रशासनाची बुरसटलेली मानसिकता अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी मलठण ते विमानतळ अशा तब्बल 75 कोटी रुपयांचा रस्त्याचे भूमिपूजन गजानन चौक येथे करण्यात आले. त्या ठिकाणी रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या स्पष्ट फलक लावण्यात आला.
मात्र निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता नियमानुसार सर्वच राजकीय पक्षाचे आणि विकासकामांचे फलक झाकण्यात आले.त्यानुसार गजानन चौक येथील फलकसह रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण शहर व ग्रामीण भागात स्ट्रीट लाईट देखील बसविण्यात आल्या होत्या. त्यावरील देखील फलक झकण्यात आले. आता निवडणुका होवून तब्बल 15 दिवस उलटूनही झाकलेले फलक खुले करण्यात आले नाही. यावरून नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायती यांची मानसिकता दिसून येत आहे.
फलटण तालुक्यात सत्तांतर होवून नूतन आमदार सचिन पाटील निवडून आले.हे अद्याप प्रशासनाच्या पचनी पडलेले दिसत नाही. शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यातून उडणारा धुरळा यावर देखील फलटण पालिका प्रशासन नव्याने डांबरीकरण करण्यास तयार नाही. तेव्हा फलटणची बारामती करण्यासाठी निधी तर आणावा लागणार आहेच आणि त्याच बरोबर अजितदादा पवार यांच्याप्रमाणे रणजितदादांना सर्वच प्रशासकीय यंत्रणांवर वाचक निर्माण करावा लागणार आहे.
बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
मंत्रिपदासाठी साताऱ्याला सांगली पॅटर्न ; तीन की चार मंत्रिपदे मिळणार ?
सातारा : विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. आज मुख्यमंत्रीपदासह दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होत असताना मंत्र्यांचा शपथविधी मात्र पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. अशात ज्या सातारा जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश मिळवून दिले त्या सातारा जिल्ह्याला त्याच तुलनेत आणि सांगली पॅटर्नच्या धर्तीवर मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे.
2009 ते 2014 या कालावधीत सांगली जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली होती.स्व.पतंगराव कदम यांना काँग्रेसकडून तर स्व.आर.आर.पाटील आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री अशी एकूण तीन दणदणीत खाती देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सातारा जिल्ह्याला ना.रामराजे ना.निंबाळकर यांच्या स्वरूपात केवळ एक मंत्रिपद देण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेत. सध्या शिवसेनेकडून आ.शंभूराज देसाई तर भाजपकडून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ.जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीकडून आ.मकरंद पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. एकाच सातारा जिल्ह्यातून चार प्रबळ नावे चर्चेत आहेत. अशावेळी एकाच जिल्ह्यातून चार मंत्री करताना महायुती ज्येष्ठ नेत्यांनी सातारा जिल्ह्याला सांगली पॅटर्न वापरून काँगेस व शरद पवार राष्ट्रवादी यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा गड अधिक भक्कम करण्याची संधी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
कारखानदार आमदार झाले ; महिना उलटूनही शेतकऱ्यांना एफ.आर. पी प्रमाणे उसाचे पैशे मिळेनात : रयत क्रांती संघटनेचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांचा आंदोलनाचा इशारा
सातारा : कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैशे मिळतील, अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांश कारखाने सुरू होवून आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी देखील एफ.आर. पी प्रमाणे १४ दिवसाच्या आत आणि उसाचा दराप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत बहुतांश कारखानदार आमदार झाले आहेत. तर काही कारखान्यावर आमदारांचे अप्रत्यक्ष होल्ड आहे. त्यामध्ये पाटण येथील बाळासाहेब देसाई कारखान्यावर आ.शंभूराज देसाई, साताऱ्यातील कारखान्यावर आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराडच्या कुष्णा व जयवंतराव भोसले कारखान्यावर आ.अतुल भोसले यांच्यासह फलटण येथील स्वराज कारखान्यावर किंगमेकर माजी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यासह कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे यांचा पडळ येथे कारखाना आहे. अशावेळी कारखानदार आमदार झाल्यानंतरतरी शेतकऱ्यांना वेळेत म्हणजेच ऊस कारखान्याला पाठविल्यापासून १४ दिवसाच्या आत एफ.आर. पी प्रमाणे उसाचे पैशे खात्यावर बंधनकारक आहे. मात्र अद्याप एक महिना उलटून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि अद्याप ऊस दर देखील जाहीर केलेला नाही. त्यामुळे अखेर रयत क्रांती संघटनेचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!
सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...
-
सातारा : फलटण शहरातील नागरिकांना लाखो रुपये पालिकेचा कर भरून देखील पायाभूत सुविधा मिळत नसल्याची मोठी परंपरा आहे. मात्र, आता फलटण शहराचा राजप...
-
सातारा ( सम्राट गायकवाड) : विधानसभा निवडणूकीत 'अजित दादांचा वादा ' टॅग लाईनवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटणसह संपूर्ण राज्यात ब्...
-
सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...





