सोमवार, २७ जानेवारी, २०२५

साताऱ्याच्या पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे बॅनर पालिकेने हटविले

सातारा :  मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून पालकमंत्रीपदाच्या सुरू झालेल्या चर्चेला अखेर मागील आठवड्यात ब्रेक लागला अन् सातारा जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा ना. शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली. नुकतेच चार दिवसांपूर्वी ना.शंभूराज देसाई यांचे सातारा जिल्हा व शहरात शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी सातारा शहरात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी  बॅनर लावले. मात्र ते बॅनर विनापरवानगी असल्याचे कारण समोर करत पालिकेने चार दिवसांनी ते बॅनर हटविले आहेत. 


दरम्यान, पालकमंत्रीपदाची जेव्हा चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. मात्र, ना.शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आल्यानंतर ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती तर जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.  परंतु अखेर ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्री पदाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे सांगून विषयावर पडदा टाकला. परंतु तब्बल चार दिवसानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा शहरातील बॅनर बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार पालिकेला होण्यामागे राजकीय ट्विस्ट असल्याची चर्चा सध्या सातारा शहरात सुरू असल्याचे समोर येत आहे.



महात्मा फुले वाडा, सावित्रीमाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. २३: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.

पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या स्मारकांच्या विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि सावित्रीमाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे.
प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

शूक...... सातारा जिल्ह्यात कायद्याचे राज्य चालू आहे...! पोलीस ठण्यासमोर लाडक्या बहिणींनी हंबरडा फोडला ; भाजप शहराध्यक्षांनी मोर्चे काढले

सातारा ( सम्राट गायकवाड) :  'सदरक्षणाय खलनिग्रहनाय ' म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण, अशा ब्रीदवाक्यानुसार पोलीसदलाने कर्तव्य पार पाडणे अपेक्षित असते. मात्र, खरचं अशा प्रकारे कारभार न होता अक्षरशः उलट्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातील ठराविक पोलिस अधिकारी आणि लाडक्या कर्मचाऱ्यांकडून कारभार सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांना अजित मल्टीस्टेट बँकेच्या गैरकारभारा विरोधात पीडित शेकडो महिलांना घेवून फलटण पोलीस ठाण्यात कैफियत मांडावी लागते, प्रजासत्ताकदिनी मोर्चा देखील काढावा लागतो, मात्र साधी एक एफ.आय.आर.घेतली जात नाही. हे आहे कायद्याचे राज्य ? 

मात्र, ६ मार्च २०२४ रोजी ह्याच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नसताना २० वर्ष प्रामाणिक पत्रकारिता केलेल्या पत्रकाराला बोलावले जाते. तीन तास बसवून ठेवले जाते आणि पुढे बेकायदेशीररित्या खासगी गाडीत डांबून घालत सातारला शहर पोलिस स्टेशन येथे नेले जाते. त्या ठिकाणी तीन तास बसवून ठेवले जाते. अन् मग रात्री १० वाजता खोटी एफ.आय.आर.तयार करून खोटे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, पुढे जेव्हा न्यायालयात निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी त्याबाबतचे फलटण ग्रामीणचे सीसीटिव्ही फुटेज माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागून देखील फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक हे जाणीवपूर्वक देण्यास नकार देतात. हे आहे कायद्याचे राज्य...?

त्याच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महाडिक यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि विशेष म्हणजे गृहमंत्रीपद असलेल्या भाजप फलटणचे शहरअध्यक्ष अनुप शहा  तसेच २०० पेक्षा अधिक फसवणूक झालेल्या पीडित महिला आपली कैफियत मांडत आहेत. मात्र, ते आवाज ऐकायला तयार नाहीत. एक साधी एफ.आय.आर.देखील दाखल करून घ्यायला तयार नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला एफ.आय.आर.दाखल नसताना निरपराध पत्रकाराला डांबून ठेवतात आणि खासगीत सांगतात माझ्यावर वरिष्ठांचा दबाव होता. हे आहे कायद्याचे राज्य...?

आता भाजप शहर अध्यक्ष अनुप शहा यांनी आज शेकडो पीडित महिलांना घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा येथे भेट घेतली. नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. वास्तविक पाहता महायुती सरकार आणि त्यांचे सरकारमधील तिन्ही भाऊ हे आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान करत आहेत तर दुसऱ्या बाजूला फलटण ग्रामीण पोलीस ठण्यासमोर अन् विशेष बाब म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाडक्या शेकडो बहिणी हंबरडा फोडत आहेत. तेव्हा आजच पहिली एफ.आय.आर.दाखल होणे अपेक्षित आहे. मात्र, काल २६ जानेवारी रोजी  पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ज्या प्रकारे मोठ्या भाजप शहराध्यक्ष अनुप शहा यांच्याशी सुरुवातीला मोठ्या आवाजात अन् मिडियाचे कॅमेरे दिसल्यानंतर खाली आवाज करून आमचा तपास सुरू आहे, मी चुकलो तर पोलिस अधीक्षक माझ्यावर कारवाई करतील. ही भाषा सरकारच्या लाडक्या आणि हंबरडा फोडणाऱ्या बहिणींना पोलीस निरीक्षकाची आहे. म्हणूनच अशा कायद्याचे राज्य असलेल्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाडक्या बहिणींना आणि नेतृत्व करत असलेल्या अनुप शहा यांना न्याय मिळेल? ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण हे राज्य कायद्याचे आहे ?

विशेष बाब म्हणजे मागील १५ दिवसापूर्वी फलटण तालुक्यातील विडणी येथे शेतात अज्ञात महिलेचा अमानुषरित्या खून झाल्याची घटना घडली. अवयवाचे अनेक तुकडे केल्याने मृत महिलेची ओळख देखील अद्याप पटली नसल्याची माहिती समोर येत आहे अन् दुसऱ्या बाजूला आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. साहजिकच बक्षीस जाहीर करणे कायदेशीर प्रक्रिया असली तरी यावेळी पोलीस दलाच्या डिटेक्शन आणि एल.सी. बी. अशा ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात ते पुढील भागात येत राहतीलच. कारण राज्य संविधानाचे आहे आणि प्रश्न उपस्थित करत राहणे, हा नागरिकाला, श्रमिक पत्रकाराला संविधानाने दिलेला अधिकार होय. 

 






















 
 

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

बीड पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदय, सातारा जिल्ह्यातील शस्त्र परवाना यादी वेळीच जाहीर करा.

सातारा: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर सर्वत्र आणि सर्वच समजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर समाज सेविका अंजनिया दमानिया यांनी अमानुष हत्येचा निषेध व्यक्त केला आणि पुढे जावून शस्त्र बाळगणाऱ्याची चित्रे  सोशल मीडियावर जाहीर केली. 


अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यात देखील अशा पद्तीने व्यवस्था निर्माण केली गेलीय. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पवन चक्की सातारा जिल्ह्यात आहेत. मात्र,  इथे खंडणी मागण्याचे प्रमाण अल्प आहे. परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि विशेषतः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खासगी शस्त्र आणि परवाना घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे खासगी शस्त्र का कोणासाठी आणि कशासाठी वापरत आहेत ? ही चर्चा सध्या सुरू असून जिल्हाधिकारी यांनी यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे उत्साहात अनावरण

सातारा : अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे शिवप्रेरणा प्रतिष्ठान राजधानी सातारा यांचे २०२५ यावर्षीच्या दिनदर्शिकेचे अनावरण सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील साहेब, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख  आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती १०८ प.पू. श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले तर पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिनदर्शिकेच्या उत्कृष्ट छपाई बद्दल व सलग सहा वर्ष आकर्षक दिनदर्शिका काढत असल्याबाबत प्रतिष्ठानला धन्यवाद दिले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्रीमहंत सुंदर गिरीजी महाराज यांनी दिनदर्शिकेचया सुंदर व आकर्षक छपाई व प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती घेऊन प्रतिष्ठांनला आशीर्वाद दिले.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव इंगवले, सचिव दीपक पाटील,मनोज निंबाळकर, विशाल भोसले,ऍडव्होकेट विनोद निकम, कुमार पोतदार, शांताराम भणगे,निलेश शिंदे इत्यादी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नूतन जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांचा शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

वाई तालुक्यातील शेंदूरजने येथील हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृत्यू ; रिपाइंचा आरोप: वाल्मीकला अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

सातारा : वाई तालुक्यातील शेंदूरजने येथील हॉटेल कामगाराचा मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असल्याचा आरोप रिपाइं ( आंबेडकर ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संजय शेलार असे मृत हॉटेल कामगाराचे नाव असून केवळ राजकीय वरदहस्तापोटी मस्त्वाल हॉटेल मालक असलेल्या आणि वाल्मीक म्हणून परिचित झालेल्याने सहकाऱ्यांच्या साथीने आपल्याच हॉटेल कामगाराचा घात केला असल्याचा आरोप रिपाइं ( आंबेडकर ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी  केला आहे.  कण्हेर ते वाई तालुक्यात हॉटेल उभा करणाऱ्या आरोपी हॉटेल मालकाला आणि सातारा तालुक्यातील एका बड्या नेत्याचा जवळचा वाल्मीक म्हणून परिचित झालेल्या आरोपीला तत्काळ अटक करा, अन्यथा येत्या १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

मृत संजय शेलार यांच्या वडिलांनी देखील मेढा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती घेण्यात आली नाही. पोस्ट मार्टमध्ये देखील गंभीर मारहाणीमुळे संजय शेलार यांचा मृत्यू झाला असल्याचे, निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तात्काळ हॉटेल कामगाराचा मारहाण करून  मृतदेह फेकून देणाऱ्या हॉटेल मालकावर तत्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हाअध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकारी किरण ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, अनिल बनसोडे, सुरेश नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

देवाभाऊ सातारा जेलची क्षमता वाढवा ; वाईट पद्धतीने सडतात कैदी

सातारा : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्र जबाबदारी देवेंद्र फडणवीस ( देवाभाऊ)  यांच्याकडे पुन्हा एकदा आलीय.  जबाबदारी वाढलीय. राज्याची जबाबदारी वाढलेली असताना गृहमंत्री पद स्वीकारलेले देवाभाऊ यांनी सातारा जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे 

सातारा जेलची परिस्थिती भयानक .११ तालुक्याचे आरोपी इथे डांबले जातात. सातारा जेल कैद्यांची क्षमता १६० आस पास आहे. मात्र, एक हजार कैदी आत आहेत. मानव अधिकार पासून पशू सारखी वागणूक  त्या ठिकाणी मिळत आहे. झोपायला देखील जागा सातारा कारागृहात शिल्लक नाही. एकदा गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जेल ( कारागृह) येथे भेट देण्याची आवश्यकता आहे.

भाग १ 

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...