मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

जिंती गावच्या उपसरपंचपदी श्री बुवासाहेब बबनराव रणवरे यांची बिनविरोध निवड

फलटण: जिंती गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्री. बुवासाहेब बबनराव रणवरे उर्फ शरद (सर) यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी  सरपंच व सर्व सदस्य तसेच श्री. जितोबा ग्रामविकास पॅनेलचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावच्या वतीने उपसरपंच बुवासाहेब रणवरे यांचा सत्कार करण्यात आला.

 

जिंती गावाला मोठी परंपरा आहे. परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार असून  जिंती गावाने माझ्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थक ठरवू. आतापर्यत जिंती गावचा झालेला विकास पाहता आजून ताकदीने येणाऱ्या काळात सर्वाना सोबत घेवून करू.जिंती गावात चालू असलेली विकास कामे पाहता अजून ताकदीने कसा निधी आणता येईल याचाही प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. बुवासाहेब रणवरे यांनी दिली.

यावेळी निवडणूक कामकाज सर्कल अधिकारी श्री. गाडे साहेब यांनी काम पाहिले. तसेच याप्रसंगी तलाठी नलगे भाऊसाहेब आणि ग्रामविकास अधिकारी श्री. बनकर अण्णा उपस्थित होते.या निवडीबद्दल विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी अभिनंदन केले..


बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

बुद्ध विहार मागणीचे फलटणमध्ये आंदोलन सुरू ; डेमॉक्रॅटिकचे मंगेश आवळे रणांगणात

फलटण : बुद्ध विहार मागणीसाठी साखरवाडी ते फलटण लाँग मार्च केल्यानंतर फलटण तहसील कार्यालयासमोर हजारो अनुयायी ठाण मांडून आहेत. आरक्षणावर निवडून आलेला माजी आणि आजी आमदार फिरकलेला नसताना ,   त्यांचा निषेध आणि मागणीसाठी एकमेव राजकीय व्यक्ती लाँग मार्च मध्ये चालत होता. डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष पैलवान मंगेश आवळे .

आंदोलनाला सर्व अर्थाने पाठिंबा देण्याचे ग्वाही
डमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे मंगेश आवळे आणि जिल्हा सरचिटणीस अभिजित ननावरे आणि निलेश घोलप यांनी दिली आहे.

ना. अजित पवार , आ. रामराजे आपला पुरोगामित्वाचा चेहरा उघड पडला ; बुद्ध विहार मागणीसाठी साखरवाडी ते फलटण लाँग मार्च निघाला



सातारा :  विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिक्षण आणि अनुकरण करण्यासाठी  तरुण पिढीला मार्गदर्शक केंद्र म्हणजेच बुध्द विहार हे साखरवाडी, तालुका फलटण येथे उभारण्यात यावे,ह्या मागणीसाठी फलटण तालुक्यातील  हजारो अनुयायी यांचा लढा सुरू आहे. 30 किलोमीटरचा साखरवाडी ते फलटण तहसील कार्यालय  लाँग मार्च करून पुढे 3 दिवस फलटण तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.


10 हजार मतदार असलेल्या ह्याच साखरवाडी गावात विधानसभा निवडणुकी दरम्यान, अजित पवार यांनी भले मोठे भाषण ठोकले . राजे कंपनीचे मालक संजीवराजे यांनी देखील मोठे ह्याच साखरवाडी गावात भाषण ठोकले. मात्र, लोकांच्या पदरात काय ? जे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान मुळे आमदार झालेले माजी आमदार दीपक चव्हाण आणि विद्यमान आमदार सचिन कांबळे हे देखील आंदोलन स्थळी आले नाहीत, हे निषेधार्ह आहे, असल्याची माहिती आंदोलनकर्ते देत आहेत.


मात्र, ज्या पुरोगामी तत्त्वाचा चेहरा, राजे & कंपनी आणि ना.अजित पवार पांघरून होते. दोघांचा खरा चेहरा आंदोलनाने उघड केला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समर्पित करून देशातील 140 कोटी लोक संख्येला समता तत्वार न्याय दिला. मात्र, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिक्षा घेतलेले गौतम बुद्ध यांचे विचार प्रेरणास्थान उभारण्यासाठी 75 वर्षा नंतर देखील अनुयायी यांना संघर्ष करावा लागत असेल तर आत्मचिंतन राज्यकर्ते ना.अजित पवार व 30 वर्ष राज्य केलेल्या आ.रामराजे नाईक निंबाळकर तसेच आ. सचिन कांबळे माजी आमदार दीपक चव्हाण आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे 





 

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

गृहमंत्री..! सातारा एल. सी. बी.मध्ये चाललंय काय ?

सातारा:  अनेक कारणांनी राज्याचे गृहखाते चर्चेत आहे. साहजिकच गेली दहा पैकी 8 वर्ष गृहखाते ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, साताऱ्याच्या पोलीस दलात ते अमुलाग्र बदल ते घडवू शकेल नाहीत. साताऱ्याच्या पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या टप्प्या टप्प्याने होत असल्यातरी सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या सातारा एल.सी.बी.म्हणजेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेली 8 वर्षापासून का रखडत ठेवल्या आहेत ? हे लाडके कर्मचारी कोणाचे आहेत? परफॉर्मन्स काय ? याचा आढावा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई घेणार आहेत का ? की आपल्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमाणे आरोप होण्याची प्रतिक्षा करित आहेत?


पोलीस दलात सेवा सुरू केल्यानंतर 99 टक्के कर्मचाऱ्यांची इच्छा असते की आपला हूनुर, सिद्धता दाखवण्याची. मात्र, सातारा पोलीस दलात एकाच म्हणजे जसे की वाहतूक ( ट्रॅफिक) शाखेत, डीबी ( डिटेक्शन) आणि सर्वात महत्वाची शाखा म्हणजे एल.सी.बी. ( लोकल क्राईम ब्रांच तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) येथेच गेली अनेक वर्ष तेच आणि तेच कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. परिणामी केवळ बंदोबस्ताचे काम पाहण्याची वेळ उर्वरित कर्मचाऱ्यांवर येतेय. मात्र, विशेषतः सातारा पोलीस अधीक्षक ह्यांच्याकडे एल.सी.बी.कर्मचारी यांच्याविषयी लेखी अनेक तक्रारी आहेत.त्यावर काय कार्यवाही केली ? याचे उत्तर प्रस्तुत अर्जदाराना कायदेशीर सौजन्य पोलीस अधीक्षक यांच्याकडे नसल्याचे दिसून येते.

सातारा एल. सी. बी मध्ये आहे नेमके काय ? हे खाते पोलीस दलाचा पाया आहे. मात्र, ही शाखा राजकीय आणि आर्थिक झाल्याची चर्चा आहे. ह्या शाखेच्या पोस्टवर प्रमुख नेमण्यासाठी दिड वर्षापूर्वी माण आणि पाटणमधील दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी झाली, अशी ही चर्चा आहे. 
सातारा एल.सी. बी. शाखा सर्वात कठीण म्हणजे संवेदनशील , स्थानिक पोलीस स्टेशन एखादा गुन्हा उघडकीस आणू शकत नसल्यास अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याची, उघड करण्याची, आरोपी जेरबंद जबाबदारी ह्या शाखेवर आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्याचा म्हणजेच आर्थिक अहवाल पडताळणी कॅग करते. मात्र, सातारा एल.सी. बी. आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परफॉर्मन्सचा अहवाल नेमका कधी प्रसिध्द होणार ? सातारा एल.सी.बी.शाखा एवढी ठराविकच कर्मचाऱ्यांना का प्रिय आहेत ? ऑफ द रेकॉर्ड ह्या कर्मचाऱ्यांच्या संपत्तीचा आणि ऑन द कॉल रेकॉर्ड अहवाल कधी तरी गृहमंत्री घेणार आहेत का ?


अन्यथा स्वतः उद्योजक ते मटका, गुटखा, बिअर बार, देशी दारू, ढाबे, स्टोन क्रशर, पवनचक्की ते अनेक सेक्टर मधील वैध ते अवैध व्यावसायिक स्वतः किती महिन्याला देतात, हे गृहमंत्र्यांनी आपली खासगी संस्था कामाला लावून  तपासण्याची गरज आहे . तसेच सातारा एल.सी.बी. मध्ये किती सचिन वाझे तयार झाले आहेत, ह्याचा देखील तपास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनिल देशमुख होण्याअगोदरच करण्याची आवश्यकता आहे.

भाग १

क्रमशः 

 

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

मालन माने यांना राज्यस्तरीय आदर्शमाता पुरस्कार ; मा.राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान

सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतनगरी न्यूज नेटवर्क, कराड यांच्यावतीने यंदाचा राज्यस्तरीय आदर्शमाता पुरस्कार सातारा येथील मालन लाला माने, सातारा यांना सिक्कीमचे माजी राज्यपाल व ज्येष्ठ माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे आयोजित सोहळ्यात मालन माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ.अतुल भोसले, आ.मनोज घोरपडे, राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, यशवंत नगरी न्यूज नेटवर्कचे संपादक विकास भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य केलेल्या ११ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 


गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

छत्रपती शिवाजीमहाराज नगर जयंतीपूर्वी कमान लावावी, अन्याथा ; फलटण नगर पालिका सीईओ आणि अभियंता यांनी शिवभक्तांच्या घरी जेवायला यावे



फलटण: आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी नगर करण्याचा ठराव फलटण नगर पालिकेत 1987 साली तत्कालीन नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी केला. तसा फलक देखील 35 वर्ष  हॉटेल मधुडीप समोर होता. मात्र तो फलक आज नाही आहे. पण सामुदायिक सगळ्या  4 हजार नागरिकांची ओळख ,रेशनिंग,आधार, व्होटिंग, पासपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे. मात्र महाराजांचा फलक कोठे ही नाही.




छत्रपती शिवाजी महाराज नगर तालीम मंडळाची इमारत देखील आहे. त्याच समोर फलटण शहरात एकमेव 3 एकर चे खुले मैदान देखील आहे. ( Tyachyavar वेगळे )
४ हजार नागरिकांच्या आधारकार्ड , रेशनिंग, पासपोर्ट वर वर छत्रपती शिवाजी महाराज नगर आहे .मात्र एक ही फलक महाराजांचा नाही. सरलष्कर बाबाराजे खर्डेकर विद्यालय. म्हणजेच बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे आजोबा. दिवंगत दादाराजे खर्डेकर आणि बंटीराजे खर्डेकर यांचे अनुयायी तत्कालीन नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी केलेले हे कार्य. तालीम शाळा आणि सार्वजनिक कार्य

मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाचे  ठराव असून , नागरिकांच्या आधार,पासपोर्ट वार नाव असून. इलाख्यात महाराजांचे नाव नाही. म्हणूनच तात्काळ फलटण नगर पालिका सीईओ आणि बांधकाम अभियंता. ( संजय गायकवाड आणि अभियंता कुंभार) बघून गेले. करत्तो  म्हणाले. कृती शून्य. त्यांना मागणी केल्या प्रमाणे 3 कमानी काँक्रिट लावल्या पाहिजेत. 

 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजनगर यांच्या नावाने प्रतिकृतीसहित पहिली कमान हॉटेल मधुदीप समोर, दुसरी कमान Vohra रेशनिंग समोरून, तिसरी कमान rto office शिंगणापूर रोड. अशा तीन कमानी येत्या 4 दिवसात व्हाव्यात.  मा. खासदार रणजितसिंह7ना.निंबाळकर, आमदार5 सचिन पाटील,विशेष जे प्रयत्नात आहेत ते आ.समशेर दादा ना. निंबाळकर, अशोक जाधव, अनुप शहा, बबलू मोमीन यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी. महाराजांची जयंती आणि दादांचा वाढदिवस.   उत्साहात साजरा व्हावा ही फलटण नगर पालिका कडे अपेक्षा.








 





रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

महाराष्ट्रातील महार वतनी जमिनी परत करा : रिपाइं जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा इशारा

*आमच्या पूर्वजांच्या कष्टाच्या मोबदला म्हणून मिळालेल्या हक्काच्या महार वतन जमिनी परत ( रिस्टोर) करा, अशी मागणी रिपाइं  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.


महार वतनाच्या जमिनी त्यांच्या वारसांच्या वारसांना परत करा व आमच्या पूर्वजांच्या कष्टाचा मोबदला म्हणून मिळाल्या महार वतन जमिनी परत करा या मागणीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई महमता भिमाईच्या समाधीच्या दर्शनाने सातारा जिल्ह्यातून सुरुवात करणार असल्याची माहिती महार वतन हक्क अभियानाचे प्रमुख संयोजक दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली

ओव्हाळ पुढे म्हणाले की,संपूर्ण देशामध्ये शिवकालीन काळात काही शिवकालीन वतन सातत्याने आढळून आलेले आहेत त्यामध्ये महार ,जागल्या या अशा प्रकारच्या लोकांनी दरम्यानच्या काळात ग्रामव्यवस्था पनामध्ये आपली योग्य अशी भूमिका बजावलेली आहे त्यामध्ये महार समाजाने ग्रामसेवेबद्दल इनाम व हक्क म्हणून शिवकालीन वतन व्यवस्थेमध्ये महार वतन ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे त्यामध्ये गावा गावाचे व्यवस्थापन करणे करता जी बलुते व्यवस्था होती,त्यामध्ये महार समाजाची हराकी हाडोळा हाडके असे प्रकार येतात (गावांमधील मेलेली जनावरे ओढून नेले व त्या ठिकाणी त्याची कातडी तर भागाचे विल्हेवाट लावणे तसेच गावामध्ये जागरण करून गावाचे संरक्षण करणे) त्यानंतर या संबंधित कामे पेशवाई पासून ते ब्रिटिश काळापर्यंत सुरू राहिली.ब्रिटिश लोकांनी ब्रिटिश कालीन वतनामध्ये गावाचे व्यवस्थापन व त्यांचा नफा (महसूल) मिळवण्याकरता पाटील कुलकर्णी ही पद कायम केली व त्यांनाच मदत व सहकार्य करण्याकरता चौगुला व महार या जमातींचा वापर करून घेण्यात आला.. शिवकालीन पाटील हे पद कायमस्वरूपी राहिले परंतु कुलकर्णी या पदास त्यांनी गावाचे कारभार दप्तर तसेच इतर माहिती देण्याकरता व ब्रिटिश अधिकाऱ्याची उठा ठेव म्हणून त्याला पगारी अंमलदार केले व त्यांच्याकडे चौगुला व महार हे कामास ठेवले मग एखाद्या गावात शासकीय अंमलदार आला की त्याची सेवा करणे जन्म मृत्यू याची माहिती देणे शासकीय जमिनीच्या बाबत माहिती देणे शासकीय झाडे तोड बाबत माहिती देणे चोरं दरोडेखोर बाबत माहिती देणे तसेच या गावाहून त्या गावात शासकीय माहिती पोहोचवणे इत्यादी कामे महार समाजाकडून करून घेतली जायची याबाबतचा स्वतंत्र पूर्व 1000 वर्ष काळातील रूढी परंपरा ग्रामसेवा याबाबत सखोल अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात याबाबत महार समाजाच्या हक्काचे जमीन व वतन त्यांना मिळवून देण्याचा अधिकार त्यांना प्राप्त करून दिला त्यामुळेच सदर कायद्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारी १९६९ रोजी अमलात आली....
त्यामुळेच जमीन आमच्या घरी हक्काची नाही कुणाच्या बापाची... या घोष वाक्य..... म्हणून महार वतन हक्क अभियान सुरुवात करीत आहोत,.... १ फेब्रुवारी २०२५ आमच्या येणाऱ्या पिढीच्या उदरनिर्वाहाचे साधन आम्हाला उभा करावे लागेल म्हणूनच या आंदोलनामध्ये सर्वांनी ताकतीने सामील होऊया. जिल्हावार याचे संयोजक नेमण्यात येणार आहेत

मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...