मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
तेलगी घोटाळ्यानंतर स्टॅम्प विक्रेत्यांसाठी सरकारने प्रथमच घेतला मोठा निर्णय
दिड हजार पक्षकारांचे साताऱ्याचे हेलपाटे वाचणार; फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर
फलटणमध्ये कॅनॉलचे अस्तरीकरण ...! नेमका लाभ कोणाला ? तालुक्यात विविध चर्चांना उधान
सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता श्रीराम कारखाना अवसायनात काढण्याचा सल्ला : आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा गौप्यस्फोट
दोन मोठ्या निवडणूका विरोधात ; फलटणमध्ये राजेगटाच्या प्रेरणास्थानी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार...!
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
तीन तासात ६३ जणांनी केले रक्तदान ; नवरात्रौ उत्सवानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत बालवीर मंडळाचा उपक्रम
अनाथ, बेघर, निराधार व्यक्तीच्या मदतीसाठी छोटा हात लावा : यशोधन ट्रस्टचे विनंतीपूर्वक आवाहन
शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत ह्या प्रवर्गातील ९ ते १२ वी विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन
सातारा : इयत्ता. 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून टॉप क्लास एज्युकेशन इन स्कुल फॉर इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट अंडर प्रधानमंत्री यशस्वी या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी 9 वी ते 10 वी साठी रु.75 हजार व इ. 11 वी ते 12 वी साठी रु. 1 लाख 25 हजार इतकी वार्षिक आर्थिक सहाय्य शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी व गणवेश इ. साठी देण्यात येणार आहे सदर योनेसाठी विद्यार्थ्यांची निवड हि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून आर्थिक सहाय्य डीबीटी व्दारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.
सदर योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यामधील निवडक शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून सदर शाळांची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमध्ये नमूद शाळेतील मुख्याध्यापकांना, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकूण 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्याथ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://scholarships.gov.in या पोर्टलवर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरुन घ्यावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५
सुजात आंबेडकर यांचा शनिवारी साताऱ्यात संवाद मेळावा
बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५
फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाचा सायरन वाजला...! पुढे आवाज येत होता... भिऊ नकोस मी पाठीशी...!
रयत क्रांतीचे प्रकाश साबळे यांच्या मागणीला सत्तेतील शिवसेना व राष्ट्रवादीची साथ...! शेतकऱ्यांसाठी खासदार, मंत्री, आमदार देणार एक महिन्याचे वेतन
सातारा : मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे. साबळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील साथ देत मदत जाहीर केली आहे.
ना. एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात दिला आहे. राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तर,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना प्रमुख यांनी जाहीर केलेल्या मदतीचे रयत क्रांतीचे प्रकाश उर्फ सोनू साबळे आभार व्यक्त केलेत.
दरम्यान, सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून येणारे नाही. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी बुधवारी सकाळी केले होते. त्यानंतर राज्यभरातून राजकीय नेत्यांनी मदतीची भूमिका घेण्यास सुरुवात केली.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे देखील मदतीसाठी पुढाकार घेणार असून राज्यातील विद्यमान विधानपरिषदेतील २८८ व विधानपरिषदेतील ८५ आमदार तसेच राज्यातील ४८ खासदार यांनी आपले सहा महिन्याचे वेतन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला द्यावे. त्याचप्रमाणे गेली वर्षोंनु वर्ष पेन्शन घेत असलेल्या माजी खासदार व आमदार यांनी आता शेतकऱ्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांनी देखील सहा महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन साबळे यांनी केले. तसेच सातारा जिल्ह्यातील उद्योगपती यांनी देखील CSR तरतुदीनुसार त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाने देखील आपले एका महिन्याचे वेतन व तीन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी, असे देखील आवाहन साबळे यांनी केले आहे.
मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आजी, माजी आमदार व खासदारांची पेन्शन व वेतन रक्कम द्या ; रयत क्रांतीचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांची मागणी
११ वर्षांनी आ. सदाभाऊ खोत फलटणला आले ; एवढ्या शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाला प्रतिसाद
सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे नेते, मंत्री आणि दोन वेळा आमदार झालेले ( पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना ) रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत तब्बल ११ वर्षानंतर फलटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज ( मंगळवारी) झालेल्या आंदोलनाला आले. विशेषतः गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी सत्तेत असलेले आ.सदाभाऊ खोत हे विधानपरिषदेत प्रश्न मांडण्याऐवजी रस्त्यावर आंदोलन करत असल्याने आणि लोकसभा निवडणुकीनंतर ११ वर्ष मतदारांना तोंड दाखवल्याने बहुदा फलटण तालुक्यातील अत्य अल्प शेतकऱ्यांनी आंदोलनाला उपस्थिती दर्शविली. तर उलट आंदोलनात जनावरे व्यापाऱ्यांची संख्या मात्र, लक्षणिय होती.
दरम्यान, आंदोलनांनंतर अजिंक्य सहयाद्री न्युज प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर आ.खोत म्हणाले, गोवंश हत्या कायदा बंदी दिवंगत नेते शरद जोशी हयात असताना आला. त्यावेळी त्यांनी त्या कायद्याला विरोध केला होता. मी देखील पुढे हा कायदा सभागृहात होत असताना निवेदन केले आहे आणि ह्या कायद्याचा कॅन्सर उशिरा लक्षात आल्याने अनेक शेतकरी आमच्याकडे येवू लागले म्हणूनच आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि येत्या अधिवेशनात ह्या कायद्याबाबत सभागृहात आवाज उठवणार असल्याचे खोत यांनी सांगितले. तसेच २०१४ च्या माढा लोकसभा निवडणूकीत फलटनमधुन मिळालेल्या मतांच्या प्रेमानंतर देखील ११ वर्ष न फिरकल्याने आंदोलनाला अत्य अल्प शेतकऱ्यांनी आंदोलनाला उपस्थिती दर्शविली आहे का ? असे विचारताच ते म्हणाले, माझे फलटणवरील कायम असून कधी ही आटणार नाही, असे सांगून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न आ.खोत यांनी केला.
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
फलटण नगरपालिकेच्या इमारतीतच पाणी गळती ; बांधकामाची दुरुस्ती होईल पण ऑडिट करण्याचे धाडस नूतन मुख्याधिकारी दाखवतील ?
रविवार, २१ सप्टेंबर, २०२५
सोलापूरची प्रतिक्षा संपली; साताऱ्याचे काय ? खासदारांसह पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जबाबदारी वाढली...!
शनिवार, २० सप्टेंबर, २०२५
बालकांना शिक्षण की वाहनतळ महत्त्वाचे? फलटणच्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !
फैसला मिनी मंत्रालयाचा..! बारामतीच्या चुलीवर फलटण तालुक्यात राजकीय मिसळ ; येत्या निवडणूकीत नेत्यांची होणार K.Y.C...!
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
हॅलो..माईक टेस्टिंग... मंडपवाले आवाज वाढवा ! ११ वर्षाने सदाभाऊ खोत यांचे होणार फलटणरांना दर्शन आणि मार्गदर्शन. .!
बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५
अजितदादांचा निवडणूकीत वादा ; फलटणमध्ये मात्र, विकास सेवा सह. सोसायटीच्या जागेवर आणलीय गदा..!
सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५
फलटण पालिका मुख्याधिकारी बदलीमध्ये ट्विस्ट ; राजकीय की विनंती बदली ?
फलटणमध्ये दोन आमदार, मा. खासदार निवासस्थान मार्ग झाला धोकादायक ; अखेर नागरिकच सरसावले
शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५
फलटणमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना रेड कार्पेट ; नागरिक माञ घाणीच्या साम्राज्यात
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांच्याकडून फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघ दुर्लक्षित ; झाला हा निर्णय...!
मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!
सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...
-
सातारा : फलटण शहरातील नागरिकांना लाखो रुपये पालिकेचा कर भरून देखील पायाभूत सुविधा मिळत नसल्याची मोठी परंपरा आहे. मात्र, आता फलटण शहराचा राजप...
-
सातारा ( सम्राट गायकवाड) : विधानसभा निवडणूकीत 'अजित दादांचा वादा ' टॅग लाईनवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटणसह संपूर्ण राज्यात ब्...
-
सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...